loader
Breaking News
Breaking News
Foto

आचरा देवूळवाडी येथे घरावर झाड पडून नुकसान

मालवण (प्रतिनिधी) - आचरा देवूळवाडी येथील अनंत उर्फ सुरेश गणपत कानविंदे यांच्या घरावर शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास घरापाठीमागिल अंबाडीचे झाड पडून घराचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने घराला पोटमाळा असल्याने आत झोपलेल्या मंडळींना कोणतीही दुखापत झाली नाही. मोठा आवाज झाल्याने गडबडून उठलेल्या कानविंदे यांना घराच्या नुकसानीने मोठा धक्काच बसला. ऐंन पावसाळ्याच्या तोंडावरच झालेल्या या घटनेने कानविंदे यांच्या घराचे मोठे नुकसान झाल्याने त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. याबाबत माहिती मिळताच ग्रामपंचायत सदस्य महेंद्र घाडी, कोतवाल गिरीश घाडी यांनी घटनास्थळी धाव घेत पहाणी केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg