loader
Breaking News
Breaking News
Foto

लांज्यात पूर्ववैमनस्यातून कोयत्याने वार करुन ठार मारण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती फरार, पोलिसांकडून शोध सुरु

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांज्यात पूर्ववैमनस्यातून व्यक्तीवर कोयत्याने हातावर आणि कपाळावर जोरदार वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना तालुक्यातील वेरळ बसस्टॉप येथे बुधवारी ३ मे रोजी रात्री घडली असून वार करणारी व्यक्ती फरार झाली असून पोलीसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. या बाबत पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार भारती प्रभाकर जाधव वय ५२ राहणार वेरळ बौध्दवाडी यानी फिर्याद दाखल केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यांचे पती प्रभाकर उर्फ भाई जाधव वय ५९ राहणार वेरळ बौध्दवाडी आणि जनार्दन गौतम जाधव वय ३५ रहाणार वेरळ बौध्दवाडी, यांच्यामध्ये पूर्वीपासून वाद आहेत. बुधवारी ३ ठिकाणी टीव्हीचा रीचार्ज करण्यासाठी गेले असताना जनार्दन जाधव याने पूर्वीचा वादातून प्रभाकर जाधव यांना ठार मारण्याची धमकी देत त्यांच्यावर कोयत्याने हातावर आणि कपाळावर जोरदार वार करत ठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात प्रभाकर जाधव हे गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी रत्नागिरी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

प्रभाकर जाधव यांच्यावर कोयत्याने वार करणारा संशयित जनार्दन जाधव हा फरार झाला आहे. पोलीसांकडून फरार जनार्दन जाधव यांचा शोध सुरू आहे. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात जनार्दन जाधव यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९(१)३५१(२) भादवि क . ३०७(१) ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे करीत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg