loader
Breaking News
Breaking News
Foto

सकल मराठा समाज सिंधुदुर्गतर्फे यशस्वी विद्यार्थ्यांचा १३ जून रोजी सत्कार

सावंतवाडी : सकल मराठा समाज सिंधुदुर्गच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावी व बारावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणार्‍या मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शनिवार, दि. १३ जून रोजी सायंकाळी ४ वाजता मांगिरीश बॅन्क्वेट हॉल, राजवाड्याच्या पाठीमागे, आरेकर खानावळीच्या बाजूला संपन्न होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमास कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत, नगराध्यक्षा सौ. श्रध्दा राजे भोसले, तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब, युवराज लखमराजे भोसले, जेष्ठ नेते संदिप कुडतरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. दहावी व बारावीच्या परीक्षेत ७० टक्क्‌यांपेक्षा अधिक गुण मिळविणार्‍या तसेच शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक तसेच इतर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव केला जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप नावनोंदणी केलेली नाही, त्यांनी कार्यक्रमाच्या अर्धा तास अगोदर उपस्थित राहून आपली नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे व कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg