मालवण (प्रतिनिधी) - बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण, सागरशक्ती (Oceans and People), वनशक्ती, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, युथ बिट्स फॉर क्लायमेट, मालवण नगरपरिषद, नीलक्रांती आणि महाराष्ट्र वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १३ जून रोजी सकाळी ९. ३० ते दुपारी १. ३० या वेळेत दादा शिखरे सभागृह, बॅ. नाथ पै सेवांगण, धुरीवाडा, मालवण येथे होणाऱ्या समुद्ररक्षक संमेलनामध्ये National Fisheries Digital Platform (NFDP) वर नोंदणीची विशेष मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून मच्छीमार, गरकडी, पागली, मासे विक्रेते, खुबे अथवा कालवे काढणारे, मत्स्यशेती करणारे तसेच मत्स्य व्यवसायाशी संबंधित सर्व घटकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
NFDP या पोर्टलवर नोंदणी केल्याने मत्स्य व्यवसायाशी संबंधित विविध शासकीय योजना, अनुदाने, प्रशिक्षण, डिजिटल सेवा, माहिती सुविधा आणि इतर लाभ योजनांचा लाभ मिळविणे अधिक सुलभ होणार आहे. तसेच पात्र लाभार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या मत्स्य व्यवसाय संबंधित विमा योजनेसाठीही नोंदणी करण्यात येणार आहे. National Fisheries Digital Platform (NFDP) तसेच मत्स्य व्यवसाय संबंधित विमा योजनेच्या नोंदणीसाठी इच्छुकांनी आपला मोबाईल नंबर, आधारकार्ड, पॅनकार्ड आणि बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत्येकी एक झेरॉक्स प्रत सोबत आणावी, अधिक माहितीसाठी ९४२२९६७९६४ / ९७६९६७९५३२ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.




































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.