loader
Breaking News
Breaking News
Foto

माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची सह्याद्री शिक्षण संस्थेला सदिच्छा भेट

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी राजापूर - लांजा विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार किरण (भैय्या) सामंत ह्यांच्या समवेत आज सह्याद्री शिक्षण संस्थेस सदिच्छा भेट दिली. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व आदरातिथ्य केले. तसेच संस्थेच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विकासात्मक कार्याची सविस्तर माहिती त्यांना दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भेटीदरम्यान डॉ. सुजय विखे पाटील यांनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय गोविंदराव निकम यांच्या समाधीस्थळी भेट देऊन अभिवादन केले व श्रद्धांजली अर्पण केली. या प्रसंगी बंटी पाटील, नितीन कुलकोल, उद्योजक सचिन पाकळे, उद्योजक संजय पाकळे, संस्थेचे सचिव महेश महाडिक, संचालक गुलाब सुर्वे, हरिश्चंद्र सुर्वे, प्रा. सुनितकुमार पाटील, प्रा. मंगेश भोसले, प्रा. तानाजी कांबळे, प्रा. माणिक यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg