loader
Breaking News
Breaking News
Foto

मंडणगड पंचायत समितीत शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात

मंडणगड (प्रतिनिधी) - पंचायत समिती कार्यालय मंडणगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित सोहळा उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. शिवरायांच्या स्वराज्य, सुशासन, राष्ट्रनिष्ठा व जनकल्याणाच्या विचारांचा जागर उपस्थितांनी केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी मंडणगड पंचायत समितीच्या सभापती प्रणाली चिले, उपसभापती दिपक मालुसरे, पंचायत समिती सदस्य दिप्ती घडसी, पंचायत समिती सदस्य अनिल रटाटे, गटविकास अधिकारी राजेंद्र आंधळे, पंचायत समितीचे सहायक प्रशासन अधिकारी वामण मेंढे, बांधकाम विभागाचे अभियंता देवकिनंदन सपकाळे, म्हस्के, शांताराम पवार तसेच पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, पराक्रम आणि आदर्श हे आजही समाजाला प्रेरणा देणारे आहेत. त्यांच्या विचारांचा वारसा जपत राष्ट्रहित व समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg