loader
Breaking News
Breaking News
Foto

आर बी शिर्केच्या बेस्ट कॅडेट प्रेम पाटील याचा एनसीसी कमांडिंग ऑफिसर दीक्षित यांच्याहस्ते सन्मान

रत्नागिरी (प्रतिनिधी) - २ महाराष्ट्र नेव्हल युनिट एन. सी. सी. रत्नागिरी या कार्यालयाच्या विद्यार्थी आर. बी. शिर्के शाखेच्या विद्यार्थ्यांना बेस्ट कॅडेट अवॉर्ड जाहीर झाला असून मंगळवारी कमांडर रामानुज दीक्षित कमांडिंग ऑफिसर, २ महाराष्ट्र नेव्हल युनिट एन. सी. सी. रत्नागिरी यांच्या हस्ते या विद्यार्थ्याचे सत्कार समारंभ व बेस्ट कॅडेट अवॉर्ड तसेच धनादेश देण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

एन. सी. सी. मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कॅडेटना या पुरस्काराने सन्मानित केले जाते. CWS बेस्ट कॅडेट अवॉर्ड जाहीर झाल्याबद्दल प्रेम पाटील याला सत्कार समारंभात दीक्षित यांनी गौरव करून व भविष्यकाळासाठी उत्तम मार्गदर्शन केले. प्रेम पाटील यांच्या या यशाबद्दल यशवर्धन एनसीसीचे कमांडर रामानुज दीक्षित यांनी विशेष कौतुक करून अभिनंदन केले.

टाईम्स स्पेशल

यावेळी कमांडर रामानुज दीक्षित, समादेश अधिकारी, सी आय अंकिता, पेटी ऑफिसर निशांत खलात, एलसीओ अमिजित कदम, पीओ लॉग (एफ ए) परमेश्वर झोळकर, फर्मारी मुख्य लिपिक, पुष्पा माने कार्यालयीन लिपिक, अंकिता जाधव आयकर जाधव लिपिक, विकी ठाकरे, सोनाली बोतलकर, मुग्धा मांडवी गिरमे, संकेत कांबळे महाडिकगांव या कार्यक्रमास उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg