केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - राज्य परिवहन महामंडळाच्या उत्पन्नावर अवैध प्रवासी वाहतुकीचा मोठा परिणाम होत असून, या वाहतुकीचे ‘एसटी’ला ग्रहण लागले आहे. प्रवाशांना वळवण्याबरोबर उत्पन्नवाढीसाठी एस. टी. स्थानकापासून २०० मीटरपर्यंत ‘नो पार्किंग झोन’ची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 6 जून ते १५ जूनपर्यंत धडक कारवाई मोहीम सुरू होणार आहे. सर्व बस स्थानकासमोर कारवाई होणार असून लांजात सुरक्षा शाखा, लांजा आगार व पोलीस प्रशासन यांचेमार्फ 6 जून आजपासून कार्यवाही सुरू झाली आहे.
राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विविध बैठकींमध्ये अवैध प्रवासी वाहतुकीमुळे एसटीच्या महसुलात घट होत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व विभागांना विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या मोहिमेंतर्गत बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवले जाणार असून, नियमभंग करणाऱ्यांविरोधात स्थानिक पोलिसांच्या मदतीने कारवाई केली जाणार आहे. यासाठी राज्यातील सर्व पोलिस आयुक्त व पोलिस अधीक्षकांनाही सहकार्याबाबत पत्र पाठविण्यात आले आहे.
रत्नागिरी विभागात सुरक्षा व दक्षता अधिकारी मकरंद ओटवणेकर यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात येणार आहे. विभागातील सर्व अधिकारी, पर्यवेक्षकीय कर्मचारी, आगार प्रशासन तसेच स्थानिक पोलिसांचे सहकार्य घेऊन अवैध वाहतुकीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सदर कारवाई ही सर्व बसस्थानकांवर होणार आहे. बसस्थानकांच्या बाहेर अनधिकृतपणे प्रवासी उचलणाऱ्या वाहनांमुळे एसटीच्या प्रवासी संख्येवर आणि उत्पन्नावर परिणाम होत असल्याने या कारवाईकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. “एसटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी आणि प्रवाशांना सुरक्षित व अधिकृत सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. लांजा आगार व्यवस्थापक काव्या पेडणेकर यांनी सदर माहीती दीली.











































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.