loader
Breaking News
Breaking News
Foto

जेईई ॲडव्हान्स २०२६ परीक्षेत श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वेरळचे उल्लेखनीय यश

खेड - व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत घेण्यात आलेल्या जेईई ॲडव्हान्स २०२६ या परीक्षेमध्ये श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियरकॉलेज(सी.बी.एस.ई.) वेरळ येथील इयत्ता १२ वीच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी आपल्या पहिल्याच प्रयत्नात उत्तुंग भरारी घेतली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यामध्ये पारस झगडे (AIR ३२६१), आदित्य मूर्ती (AIR ४१७२), सोहम म्हसकर (AIR ५८६८), सिध्दांत तिरपुडे (AIR ६४३८) या विदयार्थांनी आय. आय. टी. मध्ये आपला प्रवेश निश्चित केला असून प्रशालेच्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये आपले नाव कोरले आहे आणि प्रशालेची अविरत यशाची परंपरा चालू ठेवली आहे.

टाईम्स स्पेशल

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना JEE व NEET विभागप्रमुख विनोद सिंग, मयंक गुप्ता, अश्विनी कुमार, आदर्श गौरव, अंकित, शिवा, नागेंद्र सिंग, राजेश या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्था अध्यक्ष सुयश पाष्टे, चेअरमन उदय शेटवे, खजिनदार दिग्विजय इंदुलकर, प्रशालेचे प्राचार्य डॉ. एस. एस. अली, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg