loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर शहरातील समस्यांवर शिवसेना आक्रमक, मुख्याधिकार्‍यांशी केली चर्चा

गुहागर (उमेश शिंदे) - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, गुहागर शहराच्यावतीने शहरातील विविध नागरी समस्यांबाबत काल गुहागर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी यांच्यासमवेत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे सर्व शहर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पहिल्याच पावसात गुहागर बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने व्यापारी व नागरिकांची गैरसोय झाली आहे. तसेच वरचापाट दादरी वरील घरांमध्ये पावसाचे पाणी घराघरात शिरत असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत, याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. शहरातील स्वच्छतेचा प्रश्न देखील गंभीर बनला असून, यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याशिवाय, गुहागर शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी मुख्याधिकारी यांनी काढलेल्या पत्राला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जाहीर पाठिंबा दर्शविला. शहराच्या सुनियोजित विकासासाठी अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई आवश्यक असल्याचे मत यावेळी पदाधिकार्‍यांनी व्यक्त केले. गुहागरकरांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी शिवसेना सदैव कटिबद्ध आहे. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, पाणी निचरा व्यवस्था आणि स्वच्छता यावर प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. या चर्चासत्रावेळी गुहागर शहर शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg