loader
Breaking News
Breaking News
Foto

वडद कुंभारवाडी येथे जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी यांनी स्वखर्चाने केला १०० मिटर रस्ता

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील वडद कुंभारवाडी येथे रस्त्याचे खडीकरणाचे काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष व शृंगारतळी जिल्हा परिषद गटाचे सदस्य प्रमोद सिताराम गांधी यांनी स्वखर्चाने केले असून जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी यांनी या रस्त्याचे काम पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले होते. ते काम पूर्ण केल्याने शिवशक्ती विकास मंडळ, कुंभारवाडी यांच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी यांचा वडद कुंभारवाडी यांच्या वतीने भव्य दिव्य सत्कार करण्यात आला. गेली दोन पिढ्या येथील ग्रामस्थ श्रमदानातून या रस्त्याची डागडुजी करत होते. या रस्त्याची सरकारी दप्तरी नोंद नसल्याने शासकीय निधी या रस्त्यावर खर्च होऊ शकत नव्हता कारण हा रस्ता २३ नंबरला ओढला गेला नाही. त्यामध्ये असलेले ७/१२ मध्ये खूप तांत्रिक अडचणी आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे मजबुतीकरण करणे गरजेचे होते नाहीतर या रस्त्यावरून प्रवास करणे अत्यंत धोक्याचे बनले होते. साधारण ८ दिवसापूर्वी येथील सर्व ग्रामस्थ मनसेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी यांच्याकडे येथील रस्त्या संदर्भात शृंगारतळी येथील संपर्क कार्यालयामध्ये गेले होते. त्यावेळी त्यांनी या रस्त्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले व काही कॉन्ट्रॅक्टरची नावे दिली त्यामध्ये त्यांनी एक कॉन्ट्रॅक्टर फायनल करून स्वखर्चातून साधारण १०० मीटर रस्ता खडीकरण करून दिला. वडद मुख्य रस्ता ते कुंभारवाडी पर्यंत या रस्त्याचे खडीकरण करण्यात आले. सदरच्या रस्त्याचे नोंद ग्रामपंचायतीच्या दप्तरी नसल्याने या ठिकाणी कोणताही निधी वापरता येत नव्हता, पुढील पावसामध्ये या रस्त्याची दयनीय अवस्था होऊ शकते. याचा विचार करून पावसा अगोदरच या रस्त्याचे मजबूतीकरण करण्यात आले.उताराचा भाग असल्याने या रस्त्यावरून प्रवास करणे नागरिकांना धोक्याचे ठरले होते.

टाईम्स स्पेशल

आता या रस्त्याचे मजबुती करण झाल्याने या रस्त्यावरून नागरिकांचा सुखकर प्रवास होईल. वडद कुंभारवाडी मध्ये साधारणतः दोनशे- सव्वा दोनशे लोक वस्ती आहे. दिलेला शब्द पूर्ण करणे तसेच एखाद्या विकास कामावरती शासकीय निधी खर्च करता येत नसेल तर जनतेच्या हितासाठी स्वनिधीतून कुठलेही काम करण्याची तयारी असणारे मनसेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी यांनी नागरिकांच्या गरजेचा विचार करून त्वरित सदरच्या रस्त्याचे स्वनिधीतून काम सुरू केले. या कार्यक्रमासाठी मुंढर शाखा अध्यक्ष सुजित गांधी, प्रवीण गांधी, राजेंद्र पोतदार, स्वप्निल जाधव यांच्यासह वडद कुंभारवाडी येथील वाडीअध्यक्ष भरत मोरे, उपाध्यक्ष विनायक राऊत, सचिव सचिन टेरवकर, राजेश टेरवकर, सविता कदम, वनिता टेरवकर, विलास टेरवकर, सुनील मोरे, राजेंद्र मोरे, रोहित मोरे, राजाराम मोरे आदी मान्यवरांसह वाडीतील सर्व ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg