loader
Breaking News
Breaking News
Foto

रुग्णांच्या वैद्यकीय सेवेबाबत कोणतीही तडजोड करणार नाही - आरोग्य सभापती विलास चाळके

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र साखरपा येथे जिल्हापरिषदेचे उपाध्यक्ष व आरोग्य सभापती विलास चाळके यांची पहिली जन आरोग्य समितीची सभा नुकतीच संपन्न झाली. यावेळी जनतेच्या आरोग्य खात्याविषयी तक्रारीविषयी जनेतेने आवाज उठवीला. आरोग्य केंद्रात सुविधा असताना टेस्टसाठी खाजगी लॅबमध्ये पाठविणे, रुग्णांना न तपासता गोळया, औषधे देणे, रुग्णांशी असभ्य बोलणे, रुग्णालयात वेळेवर न येणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाचा गैरवापर करून व कोणतीही पूर्व सूचना न देता आरोग्य केंद्र सोडणे, हालचाल रजिष्ठर व नोंद न करणे, रजेचा अर्ज न देता गैरहजर राहणे, याबाबतीत पत्रकार संतोष पोटफोडे यांनी भांडा फोड केला. त्याचबरोबर रुग्णवाहीका वेळेवर दिवसा डॉक्टर नसल्यामुळे न मिळणे, त्याबाबतीत डॉक्टर जबाबदारी घेत नसल्याबाबतीत नेत्रा शिंदे यांनी पुरव्यासहित समस्या मांडली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोंडगाव ग्रामपंचायत सदस्या हर्षा आठल्ये यांनी आरोग्य केंद्राला एमबीबीएस डॉक्टर मिळावा व उपलब्ध सर्व सेवा रुग्णांना मिळाव्या यासाठी आग्रही मागणी केली. तर कोंडगाव सरपंच धनश्री जोशी यांना सर्व तक्रारी एकूण एका एका तक्रारीचा खरपूस समाचार घेहून रुग्णांच्या सेवेबाबत व होणाऱ्या गैरसोयबाबत कोणतीही तडजोड करणार नसल्याचे सांगून वैद्यकीय अधिकारी यांना बुष्टर डोस देऊन धारेवर धरले. यापुढे रुग्णांची कोणतीही तक्रार येताकामा नये असा सज्जड इशारा दिला. ज्याला काम करायचे नसेल तर येथे थांबू नका, असे म्हणून डॉक्टरनी आपले कर्तव्य म्हणून काम केले नाही तर सामान्य लोकांसाठी दर महिन्याला येथे जनता दरबार भरेल, हे लक्षात ठेवा ....असेही आरोग्य सभापती यांनी विलास चाळके यांनी सांगितले.

टाईम्स स्पेशल

आरोग्य केंद्राच्याबाबतीत यापुढे सकारात्मक बदल दिसेल, असा शब्द चाळके यांनी दिला. यावेळी आरोग्य सभापती विलास चाळके, माजी सभापती जया माने, जिल्हापरिषद सदस्या नेहा माने, कोंडगाव सरपंच धनश्री जोशी, तालुका वैद्यकीय अधिकारी गोविद मोरे, रायभोळे, बापू शेट्ये, केतन दुधाने, ओंकार कोलते बापू शिंदे, प्रसाद अपंडकर, अंकुश सुर्वे, अजय सावंत, विलास बेर्डे, अमोल लाड, निधी पंदेरे, नेत्रा शिंदे, हर्षा आठल्ये, लक्ष्मण कदम,संजय सुर्वे संदीप जोयशी, किरबेट सरपंच प्रिया कांबळे, आरोग्य खात्याचे सर्व कर्मचारी वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg