loader
Breaking News
Breaking News
Foto

न्हावेलीतील राजेश धाऊसकर यांना लावणी गौरव पुरस्कार जाहीर

बांदा (प्रतिनिधी) - सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली गावचे सुपुत्र, गायक कलावंत राजेश धाऊसकर यांना लोककला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल लावणी कलावंत महासंघाच्या वतीने गायक विभागात लावणी गौरव पुरस्कार - २०२६ ने सन्मानीत करण्यात येणार आहे. लावणी कलावंत महासंघाचा सोहळा १२वा वर्धापन दिन आणि लावणी गौरव पुरस्कार सोहळा बुधवार १५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता मुंबईतील दादर येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज नाट्यगृहात मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याप्रसंगी लोककला आणि लावणी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक नामवंत कलावंतांना लावणी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ज्यात जीवनगौरव पुरस्कार, ज्येष्ठ नामवंत संगीतकार मधुकर रेडकर तर लावणी गौरव पुरस्कार लोककलावंत चंद्रकांत बारशिंगे, निर्माते शंकर पिसाळ, लावण्यवती कविता घडशी, पुरुष लावणी कलावंत चंद्रकांत तांबे, शाहीर आनंद सावंत, गायिका श्रद्धा साळवी, गायक राजेश धाऊस्कर, तालवादक दीपक गायकवाड, ध्वनी संयोजक संदेश गायकवाड, याशिवाय, राजा-राणी पुरस्कार सुनील खंडागळे व मयुरी सुनील खंडागळे यांना जाहीर करण्यात आले आहेत.

टाईम्स स्पेशल

सदर सोहळ्याला सिनेसृष्टी आणि वाद्यवृंद क्षेत्रातील विविध मान्यवर कलावंत उपस्थिती लावणार आहेत. त्यांच्या शुभहस्ते वरील सर्व पुरस्कार विजेत्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. राजेश धाऊसकर या न्हावेली गावच्या गायक सुपुत्रावर संपूर्ण सावंतवाडी पंचक्रोशीतील विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राजेश यांनी न्हावेली गावचे नाव इतिहासात अजरामर केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg