मुंबई (प्रतिनिधी) : ग्राहक सहकार क्षेत्रात गेली अनेक दशके विश्वासार्ह सेवा देणार्या अपना बाजार मुलुंड शाखेचा ४९ वा वर्धापन दिन शुक्रवार, दि. २९ मे रोजी एका अनोख्या, ज्ञानवर्धक आणि समाजजागृतीपर कार्यक्रमाने उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. ग्राहकांना केवळ वस्तू विक्रीपुरती सेवा न देता त्यांचे आरोग्य, जागरूकता आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. या कार्यक्रमासाठी अन्न विश्लेषक तथा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माजी अधिकारी शीला गवळी यांना प्रमुख वक्त्या म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी सुरक्षित, आरोग्यदायी आणि योग्य आहार या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनात गवळी यांनी ‘योग्य आहार’ म्हणजे नेमके काय, बाजारात उपलब्ध असलेल्या विविध खाद्यपदार्थांची गुणवत्ता कशी तपासावी, भेसळयुक्त आणि निर्भेळ अन्नामधील फरक कसा ओळखावा, अन्नपदार्थ खरेदी करताना ग्राहकांनी कोणती काळजी घ्यावी, तसेच अन्नावरील लेबल्स, उत्पादन व कालबाह्यता दिनांक, एफएसएसएआय मान्यता यांचे महत्त्व याविषयी सविस्तर माहिती दिली. आजच्या धावपळीच्या जीवनात वाढत्या आरोग्य समस्यांमागे चुकीच्या आहार पद्धती आणि भेसळयुक्त अन्नपदार्थ मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले. आपले आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. पैशाने अनेक गोष्टी विकत घेता येतात; मात्र उत्तम आरोग्य विकत घेता येत नाही. त्यामुळे प्रत्येकाने सजग ग्राहक बनून सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थांची निवड केली पाहिजे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
सुमारे एक तास चाललेल्या या परिसंवादात उपस्थित ग्राहकांनी विविध प्रश्न विचारले. गवळी यांनी प्रत्येक प्रश्नाचे सोप्या आणि शास्त्रीय पद्धतीने उत्तर देत सर्वांना चर्चेत सहभागी करून घेतले. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ व्याख्यान न राहता एक ज्ञानमय संवाद ठरला. सर्वसामान्यांना अवघड वाटणारा विषय त्यांनी आपल्या प्रभावी वक्तृत्व शैलीतून आणि दैनंदिन जीवनातील उदाहरणांच्या माध्यमातून अत्यंत रंजक पद्धतीने उलगडून सांगितला. यावेळी अपना बाजारचे कार्याध्यक्ष अनिल गंगर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, सहकारातून विकास आणि सेवेतून विश्वास या तत्त्वावर आधारित अपना बाजार संस्था गेली ७८ वर्षे ग्राहकांच्या सेवेत कार्यरत आहे. ग्राहकांचा विश्वास, कर्मचार्यांचे समर्पण आणि सहकार चळवळीची मूल्ये यामुळेच संस्थेने आजपर्यंत यशस्वी वाटचाल केली आहे. या यशाचे संपूर्ण श्रेय त्यांनी कर्मचारी वर्ग आणि ग्राहक वर्गाला दिले. कार्यक्रमाला अपना बाजारचे उपकार्याध्यक्ष श्रीपाद पाठक, संचालक सरफरे, अश्विन उपाध्ये, माजी आमदार शरद खातू यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. वर्धापन दिनाच्या निमित्ताने अनेक ग्राहक, कर्मचारी तसेच मान्यवरांनी आपल्या आठवणी, अनुभव आणि भावना व्यक्त केल्या. अनेकांनी अपना बाजारशी असलेले अनेक दशकांचे नाते सांगताना संस्थेच्या सेवाभावी वृत्तीचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुलुंड स्थानिक समितीच्या सदस्य सोनाली सावंत यांनी अत्यंत प्रभावी आणि शिस्तबद्ध पद्धतीने केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक समितीचे अध्यक्ष वसंत भोसले, चिटणीस महेश मलुष्टे, तसेच नम्रता जाधव यांनी विशेष योगदान दिले. मान्यवरांचा परिचय, स्वागत आणि आभार प्रदर्शनाची जबाबदारीही त्यांनी समर्थपणे पार पाडली. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुलुंड शाखेचे प्रबंधक विलास साळुंखे, पालक संचालक अनिल ठाकूर, स्थानिक समिती सदस्य अॅड. प्रशांत गायकवाड, श्रीकांत कोयंडे तसेच संपूर्ण कर्मचारी वर्गाने विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या नियोजनापासून अंमलबजावणीपर्यंत सर्व बाबी अत्यंत शिस्तबद्ध आणि सुयोग्य पद्धतीने पार पडल्यामुळे उपस्थितांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले. समाजप्रबोधन, ग्राहक जागृती आणि आरोग्य संवर्धन यांचा सुंदर संगम घडवून आणणारा हा वर्धापन दिन सोहळा उपस्थितांच्या मनात विशेष छाप सोडून गेला. भविष्यातही अपना बाजारने अशाच प्रकारचे सामाजिक भान जपणारे आणि ग्राहकांना उपयुक्त ठरणारे कार्यक्रम नियमितपणे आयोजित करावेत, अशी अपेक्षा अनेक ग्राहकांनी व्यक्त केली. समाधान, ज्ञान आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत हा आगळावेगळा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न झाला.











































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.