loader
Breaking News
Breaking News
Foto

बाणकोटमध्ये जमिनीच्या वादातून घरावर हल्ला करुन मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

खेड (प्रतिनिधि) - मंडणगड तालुक्यातील बाणकोट येथे जमिनीच्या वादातून एका घरावर हल्ला करून मारहाण व तोडफोड केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १ जून रोजी पहाटे सुमारे १.१५ वा.च्या सुमारास घडली. याप्रकरणी ताहिरा अहमद शेख (४०, रा. शालिमारनगर, बाणकोट, ता. मंडणगड) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, घरासमोरील जागेच्या वादातून संशयित बिलाल शेख, माज शेख, साद शेख व ताहिरा शेख सर्व रा. बाणकोट (ता. मंडणगड) यांनी फिर्यादीच्या घरासमोर येऊन वाद घातला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संशयितांनी फिर्यादीच्या घरावरील कौले काठ्या व दगडांनी फोडून नुकसान केले. तसेच घराशेजारील कुंपण व झाडांची मोडतोड केल्याचा आरोप आहे. यावेळी फिर्यादीला लाकडी शिडीने मारहाण करण्यात आली. फिर्यादीच्या आईवरही फरशीचा तुकडा फेकून मारहाण करण्यात आल्याने त्यांच्या डोक्याला व शरीराच्या इतर भागांना दुखापत झाली. या घटनेत ताहिरा शेख व त्यांची आई रजिमा अहमद शेख (७०) जखमी झाल्या आहेत. जखमींवर उपचार करण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg