loader
Breaking News
Breaking News
Foto

दिग्गज नेमबाज जसपाल राणा यांचं निधन, 49 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; क्रीडा विश्वावर शोककळा

मुंबई :आशियाई क्रीडा स्पर्धेतील माजी पदक विजेते आणि प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक जसपाल राणा यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 49 व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. नेमबाजीतून निवृत्त झाल्यानंतर ते प्रशिक्षक म्हणून काम करत होते. जसपाल राणा यांच्या निधनाच्या वृत्ताने क्रीडा विश्वात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ते भारतीय संघाच्या दमदार कामगिरीनंतर म्युनिकहून भारतात परतले होते. म्युनिकहून दिल्लीला प्रवास करत असताना जसपाल यांची प्रकृती बिघडली. दिल्लीला पोहोचल्यावर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने थेट विमानतळावरून साकेत इथल्या मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान आज (शुक्रवार) सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जसपाल राणा (1976 - 2026) हे भारताचे एक दिग्गज नेमबाज आणि अत्यंत यशस्वी प्रशिक्षक होते। ९० च्या दशकात त्यांनी भारतासाठी अनेक आंतरराष्ट्रीय पदके जिंकली होती। खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यावर त्यांनी एक उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून भारतीय नेमबाजांना घडवले, ज्यामध्ये स्टार नेमबाज मनू भाकर हिच्या यशात त्यांचा मोठा वाटा होता.

टाइम्स स्पेशल

उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे झाला. त्यांच्या वडिलांनीच (नारायण सिंह राणा) यांना नेमबाजीचे सुरुवातीचे धडे दिले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg