loader
Breaking News
Breaking News
Foto

वनविभागाच्या अधिकार्‍यांनी जखमी वानर मायलेकाला दिला माणूसकीचा हात; दापोली शहरातील माणुसकिचे दर्शन घडविणारी घटना

दापोली (प्रतिनिधी) : दापोली शहरातील कोकंबाआळी येथे एक मादी वानर आपल्या चिमुकल्या पिल्लासह विजेचा धक्का लागून जखमी अवस्थेत विद्यूतखांबाजवळ विव्हळत पडले होते. स्थानिक प्राणीमित्र नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे व वन विभाग अधिकार्‍यांच्या तत्पर कारवाईमुळे या दोन्ही जिवांना वाचवण्यात यश आले आहे. दापोलीत वानरांचा प्रचंड वावर वाढला आहे. त्यातच दापोली शहरातसुध्दा वानरांची काही कमी नाही. वानरांच्या वाढलेल्या उच्छादामुळे बागायतदारांच्या फळ बागांमधील, घराच्या परसात मागे पुढे असलेल्या फळ झाडावरील फळांचे जसे वानरांकडून नुकसान होते तसे वानरांची आता घरातील अन्नांचे पातेले उचलून घेऊन जाण्यापर्यत मजल गेली आहे. कौले कोने उचकटून टाकणे तसेच सिमेंट पत्र्यांवर उड्या मारुन पत्र्यांची मोडतोड करण्याच्या मर्कट लिलांच्या कारनाम्यांच्या त्रासामुळे गावा गावातील रहिवाशांसह शहरातील नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यामुळे वानरांना तसं कुणीच चांगलं म्हणत नाही. अशातच बुधवारी सकाळी दापोली शहरातील कोकंबा आळी येथील झाडांच्या फांद्यांवरुन इकडून तिकडे उड्या मारत असताना वानरांनी विदयुत वाहीनीच्या तारांवर उडया मारल्या त्यातील एका वानराला त्याच्या पिल्लासह विजेचा धक्का बसला आणि वानर पिल्लासह खाली विद्युत खांबाजवळ जमिनीवर वेदनेने विव्हळत पडले. सामाजिक कार्यकर्ता असलेल्या बाल उत्साही कार्यकारी मंडळाचे अर्थातच शतकी वाटचाल करणाऱ्या तालुक्यातील सुप्रसिद्ध मानाचा गणपती मंडळाचे अध्यक्ष संजय घाडगे यांच्या सदरची बाब लक्षात आली आणि त्यांनी लागलीच वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयातील अधिकारी वर्गाला भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला आणि या घटनेची माहिती दिली.

टाईम्स स्पेशल

संजय घाडगे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे वन परिक्षेत्र दापोली कार्यालयात कार्यरत असलेले अधिकारी घटनास्थळी आले आणि जखमी झालेल्या आणि वेदनेने विव्हळत असलेल्या वानरासह त्याच्या पिल्लाला ताब्यात घेऊन पशुवैद्यकीय अधिकारी दापोली यांचे कडून मायलेकरावर उपचार करून घेतले. औषध उपचारांना प्रतिसाद देत बरे झालेल्या वानर आणि त्याच्या पिल्लाला परिक्षेत्र वन अधिकारी दापोली यांच्या सुचनेनुसार सुखरूपपणे नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. माणुसकीचे दर्शन घडविणारे हे महत्त्वाचे काम दापोलीचे वनपाल रामदास खोत, खेर्डी वनरक्षक विश्वंभर झाडे, तसेच वनरक्षक पी. एस. साबणे या अधिकाऱ्यांनी केले या त्यांच्या संवेदनशील कामाचे प्राणीमित्रांसह तालुक्यातील सर्वांकडूनच समाधान व्यक्त केले जात आहे

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg