loader
Breaking News
Breaking News
Foto

"उत्तम मंत्री ".. चक्क संजय राऊतांकडून नितेश राणेंची स्तुती

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपा चे नेते मंत्री नितेश राणे यांच्यातील विळयाभोपळ्याचे सख्य सर्वश्रुत आहे. पण आज खा. संजय राऊत यांनी चक्क उत्तम मंत्री असे गौरवोद्गार मंत्री नितेश राणेंबद्दल काढल्याने संपूर्ण राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. सव्वा चार वर्षांपूर्वी राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर दररोज सकाळी संजय राऊत हे भाजपावर तोफ डागायचे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संजय राऊत यांच्या तोफेला उत्तर देण्यासाठी भाजपाने तत्कालीन आमदार असलेले नितेश राणेंवर जबाबदारी सोपवली आणि संजय राजाराम राऊत असे संबोधत नितेश राणेंनी जशास तसे उत्तर देत संजय राणेंच्या तोफेला नामोहरम केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बिनविरोध निवडणूकीनंतर संजय राऊत यांनी केलेल्या घोडेबाजार च्या आरोपाला मंत्री नितेश राणे यांनी बरनॉल मलम दाखवून प्रत्युत्तर देत राऊत याना खिजवले.

टाईम्स स्पेशल

बरनॉल विषयाला 24 तास उलटले नाहीत तोवर संजय राऊत यांनी नितेश राणेंना राज्यातील 'उत्तम मंत्री' संबोधत मत्स्य विभागातील त्यांच्या कामाचे कौतुक करत मुक्तकंठाने स्तुती केली आहे. संजय राऊत यांनी नितेश राणेंची केलेल्या स्तुतीमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg