loader
Breaking News
Breaking News
Foto

२१ जूननंतरच मुसळधार पाऊस, शेतकर्‍यांची काळजी वाढली

अगोदरच मान्सून लांबला आणि आता तर २० जून नंतरच मुसळधार पाऊस सुरू होईल. त्यामुळे शेतकर्‍यांची काळजी वाढणार आहे. पेरा झाला आहे. पुढे लावणीचा हंगाम सुरू होईल पण २० जूनपर्यंत मुसळधार पावसाची वाट पाहत थांबावे लागणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यंदा पाऊस कमीच आहे. एलनीनोचा प्रभाव अजूनही कायम आहे. मान्सूनचे आगमन झाले आहे पण दरवर्षीप्रमाणे पाऊस नाही. कोकणात मृग नक्षत्रात मुसळधार पाऊस पडायचा मात्र सध्या कडक ऊन पडले आहे. पेरा रूजून आला आणि पाऊस नसेल तर पेरा कोमेजून जाईल त्यामुळे दुबार पेरणीचे संकट कोकणातील शेतकर्‍यांसमोर उभे राहण्याची चिन्हे दिसून येत आहेत. सरकारने पेरण्या करण्यास घाई करू नका असे सांगितले पण पेरण्या केव्हा करा हे सांगितले नाही. मात्र पारंपारिक शेती करणार्‍या शेतकर्‍यांनी सरकारच्या आदेशाची वाट न पाहता ‘देवाक काळजी’ म्हणत पेरण्या सुरू केल्या. २० जूननंतर मुसळधार पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. जुलै महिन्यातही पाऊस दगा देणार आहे. त्यामुळे यंदा शेतीची स्थिती चिंता वाढविणारी ठरणार असल्याचे म्हटले जात आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg