रत्नागिरी (टाइम्स डेस्क) -पावसाळा आला की आनंदाला उधाणाची भरती येते. सार्यांनाच आनंद होतो आणि अनेक जण पावसाळी पर्यटनासाठी जातात. मात्र तुमचे जरासे दुर्लक्ष झाले तर पूर्ण कुटुंब उध्वस्त होते. गेल्या ५ वर्षांतील विविध घटनांचा आढावा घेतला तर असे दिसून येते की, डोंगरउतारावरील धबधबे हे पर्यटकांचे आकर्षण आहे. मात्र अशा ठिकाणी जाताना पर्यटकांनी काळजी घ्यायला हवी. पावसाच्या पाण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात कातळ दगडांवर शेवाळ जमा होते. त्यावरुन पडण्याचा मोठा धोका असतो.
अतिउत्साहात आपण पाण्याच्या प्रवाहात उतरतो किंवा आपल्या कुटुंबातील लोक पाण्याच्या प्रवाहात उतरतात. त्यावेळी पाऊस नसतो. मात्र धबधब्याच्या वर डोंगरी भागात पाऊस पडत असतो. अशा वेळी पाण्याच्या मोठा लोंढा येण्याची शक्यता असते. माणसे वाहून जाण्याची शक्यता देखील बळावते. त्यामुळे पावसाळी पर्यटन करताना फार काळजी घ्यायला हवी. गेल्या काही वर्षात अनेक तरुण तरुणींना आपला जीव गमवावा लागला. त्यात त्यांचे कुटुंब उध्वस्त झाले. घरातील एखादा तरुण किंवा तरुणी अशा घटनेत बळी पडली तर जीवन निरस होवून जाते.
त्यामुळे पर्यटनाला जायचे असेल तर अशा धबधब्यांवर जाण्यापेक्षा डोंगराळ भागात पसरलेल्या हिरवळीवर मनसोक्त बागडावे. तिथे उगवलेल्या फुलांसोबत आनंद लुटावा. रत्नागिरी निवळी येथील धबधबा आता सुरु होईल आणि पर्यटक तेथे वळतील मात्र या धबधब्यावर पर्यटनासाठी गेलेल्या अनेकांचा जीव गेला आहे. त्यामुळे आपण अशा ठिकाणी पर्यटनाला जाताना अधिक काळजी घ्यायला हवी. आपण केलेली लहानशी चूक जीवावर बेतते आणि कुटुंब उध्वस्त होते. म्हणूनच अधिक काळजी घेण्याची गरज आहे.











































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.