loader
Breaking News
Breaking News
Foto

पुण्यात कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन , युवकांचा मोठा सहभाग

पुणे : कॉक्रोज जनता पार्टीचे आंदोलन सुरू झाले आहे, या आंदोलनात तरुणांचा मोठा सहभाग दिसून येत आहे तसेच सामाजिक कार्यकर्ते ही सहभागी झाले आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.या आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये जोशपूर्ण वातावरण असून घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे.कॉकरोच जनता पार्टीच्या या आंदोलनात अभिजीत दीपके आणि समाजसेवक सोनम वांगचूक याची उपस्थिती आहे. त्याचसोबत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार येथे आंदोलन होत आहे .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नीट पेपरफूट आणि सीबीएसई परीक्षेतील घोळ याची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.आंदोलक तोंडावर कॉकरोचचे मुखवटे घालून शांततापूर्ण मार्गाने निदर्शने करत आहेत.विद्यापीठ प्रशासनाने कडक अटी आणि शर्तींवर या आंदोलनाला परवानगी दिली आहे. या आंदोलनामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर तरुण व विद्यार्थी एकत्र आले आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg