रत्नागिरी - शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून आज सकाळी 8 वाजता रत्नदुर्ग किल्ला, श्री भगवती मंदिर परिसरात भव्य स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. ऐतिहासिक वास्तूचे पावित्र्य जपण्यासाठी राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, शहराध्यक्ष दादा ढेकणे, यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, शहर सरचिटणीस निलेश आखाडे, संदीप सुर्वे यांच्या पुढाकाराने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी नगरसेवक नितीन जाधव, नगरसेवक संदीप सुर्वे, संतोष सावंत, प्रसाद बाष्ठे, नितीन गांगण, शेखर लेले, सचिन गांधी, आशिष मोरे, प्रशांत घाणेकर, मंदार भोळे, निखिल घाग, विजय माळवदे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संकेत कदम, शुभम धामणस्कर, विक्रांत वाडकर, वरद लिमये, स्वप्निल गार्डी, सुमित जाधव, मिहीर कांबळे, राहील जमादार, अक्षय जाधव, अवधूत लिंगायत, आर्यन नारकर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विशेष म्हणजे, किल्ल्यावर आलेल्या काही पर्यटकांनीही उत्स्फूर्तपणे या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. हातात झाडू घेऊन मंदिर परिसर, किल्ला तटबंदी भाग स्वच्छ करण्यात आला. प्लास्टिक बॉटल, कचरा गोळा करून परिसर चकाचक करण्यात आला. "शिवछत्रपतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गड-किल्ले स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. यापुढेही असे उपक्रम राबवू," असे निलेश आखाडे यांनी यावेळी सांगितले. नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून,भाजपा पदाधिकारी व युवकांच्या या कृतीतून "स्वच्छ रत्नागिरी, सुंदर रत्नागिरी"चा संदेश दिला गेला.




































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.