loader
Breaking News
Breaking News
Foto

ग्रामपंचायत गोळप येथे दापोली उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांतर्फे 'जागतिक पर्यावरण दिन' साजरा

गोळप: ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत (RHWE) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या उद्यानविद्या महाविद्यालय, दापोली येथील विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायत गोळप येथे 'जागतिक पर्यावरण दिन' उत्साहात साजरा केला. पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धनाचा संदेश देण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान गोळप गावच्या सरपंच प्रियांका सुर्वे आणि उपसरपंच संदिप तोडणकर प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांच्या हस्ते आणि उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विद्यार्थ्यांनी यावेळी ग्रामस्थांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देत झाडे लावणे आणि ती जगवणे काळाची गरज असल्याचे सांगितले. सरपंच प्रियांका सुर्वे यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले व ग्रामपंचायतीतर्फे अशा पर्यावरणपूरक उपक्रमांना नेहमीच पाठिंबा दिला जाईल, अशी ग्वाही दिली. उपसरपंच संदिप तोडणकर यांनीही तरुणांनी पर्यावरण रक्षणासाठी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg