loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली तालुक्यातील टेटवली येथे एसटी आणि दुचाकीची धडक, दुचाकीस्वार जखमी

खेड: (प्रतिनिधी)- दापोली तालुक्यातील वाकवली-उन्हवरे मार्गावरील टेटवली येथे गुरुवारी ११ जून रोजी एसटी आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वाकवली-उन्हवरे मार्गावर टेटवली परिसरात एसटी बस आणि समोरून येणार्‍या दुचाकीची धडक झाली. यामध्ये दुचाकीस्वार जखमी झाला असून दुचाकीचे नुकसान झाले आहे. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीला मदत केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अपघातानंतर काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. मात्र, स्थानिकांच्या मदतीने आणि संबंधित यंत्रणांच्या प्रयत्नांमुळे वाहतूक सुरळीत करण्यात आली. जखमी दुचाकीस्वारावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, या अपघातात दुचाकीस्वार थोडक्यात बचावल्याने मोठी दुर्घटना टळली. अपघाताचे नेमके कारण समजू शकले नसून याबाबत अधिक तपास सुरू आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg