loader
Breaking News
Breaking News
Foto

महामार्ग बाधिताला मोबदल्याची प्रतीक्षा; कोंडगावच्या शेतकऱ्याचा न्यायासाठी एल्गार

देवळे (प्रकाश चाळके) - मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या कामासाठी जमीन संपादित होऊनही, योग्य मोबदल्यापासून वंचित असलेल्या कोंडगाव येथील सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत कृष्णाजी चिले यांनी आता प्रशासनाविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. आपल्याला न्याय न मिळाल्यास आपल्या जागेतील महामार्गाचे काम थांबवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोंडगाव येथील सर्व्हे नंबर २०/२ क आणि २१/३ अ या क्षेत्रातील जमीन महामार्गासाठी संपादित करण्यात आली आहे. महामार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून ते अंतिम टप्प्यात आहे. परिसरातील इतर सर्व बाधितांना त्यांच्या जमिनीचा मोबदला शासनाकडून प्राप्त झाला आहे. मात्र सर्व सोपस्कार पूर्ण करूनही चंद्रकांत चिले यांना अद्याप मोबदला मिळालेला नाही. मोबदल्याबाबत चिले यांनी संबंधित यंत्रणेकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. परंतु, केवळ आश्वासनांचे गाजर दाखवून आपली बोळवण केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या अन्यायाविरुद्ध अखेर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे ‘लोकशाही दिना’त लेखी तक्रार नोंदवली आहे.

टाईम्स स्पेशल

इतरांना मोबदला मिळतो मग माझ्यावरच अन्याय का? असा संतप्त सवाल चिले यांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने न पाहिल्यास आणि तत्काळ मोबदला न दिल्यास, यापुढे कोणत्याही परिस्थितीत आपल्या जागेतून महामार्गाचे काम होऊ देणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. यामुळे आता प्रशासकीय पातळीवर यावर काय कार्यवाही होते, याकडे लक्ष लागले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg