loader
Breaking News
Breaking News
Foto

कृष्णा अँटीऑक्सिडंट्सतर्फे १५०० वृक्षांची लागवड

खेड : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून लोटे औद्योगिक वसाहतीतील कृष्णा अँटीऑक्सिडंट्स कंपनीने पर्यावरण संवर्धनासाठी डोंगराळ भागातील पडीक जमिनीवर तब्बल १५०० विविध वृक्षांची लागवड केली आहे. सामाजिक बांधिलकी जपत कंपनीने औद्योगिक वसाहतीतील डोंगराळ भागातील पडीक जमीन २५ वर्षांच्या भाडेकरारावर घेतली असून या उजाड परिसराचे हरित क्षेत्रात रूपांतर करण्याचा संकल्प हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत स्थानिक देशी वृक्षांसह विविध फळझाडांची लागवड करण्यात आली असून. भविष्यात या परिसरातील जैवविविधतेला याचा मोठा फायदा होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

डोंगर उतारावरील वृक्षांचे संगोपन करण्यासाठी संपूर्ण परिसरात ठिबक सिंचन व्यवस्था उभारण्यात आली असून सर्व झाडांना नियमित पाणीपुरवठा होणार आहे. तसेच पाण्याची कमतरता भासू नये यासाठी ५ हजार लिटर क्षमतेच्या दोन पाण्याच्या टाक्यांची उभारणी करण्यात आली आहे. वृक्षलागवड कार्यक्रमानंतर कंपनीच्या वतीने लोटे पंचक्रोशीतील ग्रामस्थांना पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला कंपनीचे जनरल मॅनेजर एस. एम. पाटील, अधिकारी रोहित महाडेश्वर, शुभम कदम, रोहन शिंदे, किरण घाग तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ राजेश आंब्रे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

कंपनीचे सर व्यवस्थापक एस. एम. पाटील म्हणाले की, सध्याच्या काळात वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. भविष्यात आणखी डोंगराळ भागातील पडीक जमीन भाडेतत्त्वावर घेऊन तेथे वृक्षलागवड व संवर्धन करण्यासाठी आमची कंपनी कटिबद्ध राहील.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg