loader
Breaking News
Breaking News
Foto

नाशिकमध्ये पूर्ण ताकद लावून देखील महायुतीला बंडखोरी रोखता आली नाही

मुंबई : राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याचं पहायला मिळालं होतं. इच्छा असूनही ज्यांना तिकीट मिळालं नाही, अशा अनेक इ्च्छूक उमेदवारांनी बंडखोरी केली होती. ही बंडखोरी महायुतीसाठी डोकेदुखी ठरू शकते असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु गुरुवारी विधान परिषद निवडणुकीतून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी महायुतीला ही बंडखोरी मोडून काढण्यात मोठ्या प्रमाणात यश मिळालं. मात्र नाशिकमध्ये पूर्ण ताकद लावून देखील या मतदारसंघातील बंडखोरी महायुतीला रोखता आली नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महायुतीमध्ये नाशिकची जागा ही शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला आली. या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाने नरेंद्र दराडे यांना अधिकृत उमेदवारी दिली. मात्र त्यापूर्वीच गणेश गीते यांनी भाजपच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता, तर त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. गणेश गीते यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. मात्र गुकुळ गीते अजूनही ही निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत, त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाहीये. त्यामुळे आता शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचं टेन्शन वाढलं आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg