loader
Breaking News
Breaking News
Foto

वाशिष्ठी दूध डेरी परिसरात दुचाकी घसरून अपघात; तिघे जखमी

खेड - तालुक्यातील वाशिष्ठी दूध डेरी परिसरात दुचाकी घसरून अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकीवरील तिघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एमएच 08 एव्ही 5058 क्रमांकाची एचएफ डिलक्स दुचाकी अचानक घसरल्याने हा अपघात झाला. या अपघातात राकेश शिवराम कदम (वय 30 वर्ष), कार्तिक रमेश मोरे (वय 14 वर्ष) आणि अनिल विक्रम कदम (वय 53 वर्ष) हे जखमी झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

घटनेची माहिती मिळताच जय हिंद ॲम्बुलन्स सर्व्हिसेस घोलप यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना प्राथमिक मदत दिली. त्यानंतर तिघांनाही पुढील उपचारासाठी भरणे नाका आठवडा बाजार येथील यश मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सध्या जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg