दापोली (प्रतिनिधी) : कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा दापोली ग्रामीण आणि मुंबईच्या वतीने दापोली शहरातील श्री मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या समाज मेळाव्याला कुणबी समाज बांधवांसह भगिनींनी उपस्थित राहून दर्शविलेल्या उस्फुर्त प्रतिसादामुळे समाज मेळावा चांगलाच यशस्वी झाला. कुणबी समाजोन्नती संघ मुंबई या मातृसंस्थेची दापोली तालुका ही एक शाखा आहे. अशा दापोली तालूका मुंबई आणि ग्रामीण शाखेच्या वतीने दापोली शहरातील श्री मंगल कार्यालयात समाज बांधवांसाठी भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कुणबी समाजोन्नती संघाचे संघाध्यक्ष अनिल नवगणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या समाज मेळाव्यात फेब्रुवारी २०२६ मध्ये पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत कुणबी समाजाचे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आलेल्या सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या गुणवंतांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या कोडकौतुकाचा सोहळा मान्यवरांचे उपस्थित पार पडला. त्याचप्रमाणे शेतीचे मुळ असलेल्या कुणबी समाजातील एका उत्कृष्ट शेतकर्याला देखील गौरविण्यात आले. त्याचसोबतच आरोग्यविषयक मोफत तपासणी आणि मोफत चष्मे वाटप तसेच औषध वाटपाचा समाजोपयोगी कार्यक्रम देखील मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी संघाध्यक्ष अनिल नवगणे यांचेसोबतच अॅड. महेंद्र मांडवकर, दापोली शाखा मुंबईचे अध्यक्ष विजय नायनाक, ग्रामीण शाखेचे अध्यक्ष गजानन पडियार, कुणबी जिल्हा समन्वयक समिती जिल्हाध्यक्ष प्रकाश मांडवकर, सरचिटणीस नरेश घरटकर, ग्रामीण कमिटीचे सरचिटणीस संदीप खामकर, माजी अध्यक्ष चंद्रकांत मोहिते, माजी सभापती चंद्रकांत बैकर, भिकाजी कानसे, राजेश चौगुले, सचिन चिपटे, रविकांत भांबीड, अनंत मांडवकर, दिनेश जावळे, राजेंद्र पेडणेकर, अर्चना भावे, मंगेश पवार, सुधीर साळवी, संजय गोरीवले, मनीष मांडवकर, महेंद्र रेवाळे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी प्रमुख अतिथी मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहिलेल्या कुणबी समाजोन्नती संघाचे संघाध्यक्ष अनिल नवगणे यांच्या हस्ते आणि उपस्थितीत ऐश्वर्या धाडवे आणि मीनाक्षी शेडगे या जिल्हा परिषद सदस्यांचा तर कुणबी समाज संघात काम केलेले आणि सध्या दापोली मुंबई शाखेचे सरचिटणीस म्हणून कार्यरत असलेले नरेश घरटकर या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वासह संदीप चिखले, सुवर्णा खळे, अंकिता घुबडे या पंचायत समिती सदस्यांचा सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन समाजाच्या वतीने सन्मान करण्यात आला. तर आपल्या अभ्यासुवृत्तीने शैक्षणिक क्षेत्रात आपल्या नाव लौकिकाचा ठसा उमटवून समाजासाठी आदर्श ठरलेल्या डॉ. कस्तुरी रविकांत भांबीड (एमबीबीएस, डिएनबी, एमईडी), डॉ. नेहा दीपक गोरीवले (बीडीएस), डॉ. विशाल विलास सकपाळ तसेच बारावी आर्ट्स मध्ये दापोली तालुक्यात प्रथम आलेल्या नुपूर संदीप नवरत हिचा सुद्धा सन्मान करण्यात आला तसेच विशेष प्रगतशील शेतकरी म्हणून विविध क्षेत्रातील मानाच्या पुरस्कारासह राज्य शासनाचा उत्कृष्ट शेतकरी म्हणून पुरस्कार मिळवलेल्या अनिल शिगवण यांचा सन्मान करण्यात आला.
या समाज मेळाव्याचे औचित्य साधत जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेतर्फे मोफत आरोग्य शिबिर आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नेत्र तपासणी करत मोफत चष्मे वाटपाचा कार्यक्रम पार पडला. तसेच रक्तदाब, शुगर तपासणी व मोफत औषध वाटप करण्याच्या कार्यक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. आरोग्य शिबिरासाठी टिम प्रमुख राजू गोरे यांनी उत्तम सहकार्य केले. एकुणच कुणबी समाज बांधवांचा हा मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात संघाध्यक्ष अनिल नवगणे यांनी समाधान व्यक्त करताना काही मौलिक विचार व्यक्त केले. त्यावेळी ते म्हणाले दापोलीत कुणबी समाजाच्या हितासाठी कुणबी परिषद घ्या, सर्व कुणबींना एकत्र करा, कुणबी समाजाच्या हितासाठी आंदोलन करावे लागले तरी करण्यात यावे, कुळ कायदयाचे प्रलंबित प्रश्न असतील आणखीन जे जे म्हणून समाज बांधवांच्या हिताचे प्रश्न असतील त्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे आवाज उठवला पाहिजे, समाजातील मुलांनी शिक्षण घ्यायला पाहिजे, शिक्षित व्हायला पाहिजे, समाजातील मुलांनी मुलींनी अर्थाजन मिळवून देणारे शिक्षण घेतले पाहिजे अशाप्रकारचे मौलिक विचार व्यक्त केले.सदर समाज मेळाव्याची प्रस्तावना व सूत्रसंचालन शाखेचे माजी अध्यक्ष दीपक गोरीवले यांनी केले. या कार्यक्रमाला समाज ज्ञाती तसेच समाजातील बहुसंख्य सरपंच , पोलीस पाटील , महिला कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.




































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.