loader
Breaking News
Breaking News
Foto

छ. शिवाजी महाराजांच्या ३६२ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त गुहागरमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

वरवेली, (गणेश किर्वे) - महाराष्ट्राचे आराध्य दैवत व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३६२ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शनिवार दिनांक ६ जून २०२६ रोजी गुहागर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच अंजनवेल येथील ऐतिहासिक गोपाळगड किल्ला येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने विधान परिषदेचे नवनिवांचित आमदार प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे तसेच भाजपाचे नेते वैभव खेडेकर यांच्या उपस्थितीत गुहागर तालुक्यातील ऐतिहासिक गोपाळगड (अंजनवेल) येथे भेट देण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ठीक १०:३० वाजता गुहागर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन होणार आहे. त्यानंतर सर्व मान्यवरांसह गोपाळगड येथे प्रस्थान करण्यात येईल. तरी भारतीय जनता पार्टीचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, विविध आघाड्या, मोर्चे व सेलचे अध्यक्ष-पदाधिकारी, तसेच सर्व कार्यकर्ते आणि परिसरातील शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे उत्तर जिल्हा सरचिटणीस निलेश विश्वनाथ सुर्वे यांनी केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg