loader
Breaking News
Breaking News
Foto

पंचायत समिती गुहागर येथे शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा

गुहागर : पंचायत समिती गुहागर येथे शिवस्वराज्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त पंचायत समिती परिसरात गुढी उभारून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या ऐतिहासिक कार्याला अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे यांच्यासह पंचायत समितीचे सर्व सन्माननीय सदस्य, विविध विभागांचे खातेप्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रेरणादायी इतिहासाचे स्मरण करून त्यांच्या विचारांचे पालन करण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमात शिवस्वराज्य दिनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले तसेच उपस्थितांनी शिवरायांना अभिवादन करून स्वराज्याच्या मूल्यांचे जतन करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रम उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg