रत्नागिरी : राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची धुरा तुकाराम मुुंढे यांनी हाती घेतल्यानंतर संपूर्ण राज्यात कारवाईचा धडाका सुरू झाला आहे. याचे पडसाद रत्नागिरी जिल्हयातही उमटू लागले आहेत. मुंढे यांच्या कडक आदेशानंरत रत्नागिरीचे अन्न आणि औषध प्रशासनाकडून अवैध गुटखामाफिया आणि नियमबाहय हॉटेल चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. आठ ठिकाणी छापे टाकून ६ लाखांचा गुटखा जप्त केला असून ६० हॉटेलची छडती घेेण्यात आली. त्यातील ४ जणांना सुधारणा करण्याबाबत नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. जिल्हयात बेकायदेशीर गुटखा आणि पानमसाला विक्री करणार्यांविरोधात प्रशासनाने मोठी मोहीम उघडली आहे. या मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने रत्नागिरी जिल्हयात आठ ठिकाणी छापे टाकले. या धडक कारवाईत ६ लाख १४ हजार ५५७ रूपये किंमतीचा प्रतिबंधीत गुटखा आणि पानमसाला जप्त करण्यात आला. याप्रकरणी ६ वेगवेगळे गुन्हे दाखल केले असून ७ जणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
गुटखामाफियांसोबतच जिल्हयातील हॉटेल व्यवसायिकदेखील प्रशासनाच्या रडावर आले आहेत. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने जिल्यातील ६० हॉटेल्सची अनपेक्षित तपासणी केली. यामध्ये स्वच्छतेचे आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणार्या ४ हॉटेलमालकांना तातडीने सुधारणा नोटीस दिली आहे. इतर ३ प्रकरणांमध्ये तडजोड शुल्क म्हणून २४ हजार रुपयांचा शुल्क जागेवरच वसूल करण्यात आला.




































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.