loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली तालुक्यातीलअडखळ रस्त्याची दुरवस्था; वाहतूक झाली धोक्याची

दापोली (प्रतिनिधी) : रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अडखळ रस्त्याची दुरवस्था झाली असल्याने या मार्गावरील वाहतूक धोक्याची झाली आहे. पावसाळ्यात वाहतूक खंडीत होण्याची शक्यता अधिक आहे. दापोली तालुक्यातील अतिशय महत्त्वाचे गाव असलेल्या अडखळ येथील रस्त्यात कमालीचे खड्डे पडले आहेत. ठिक ठिकाणी रस्त्यावर पडलेले भले मोठे खड्डे पाहता रस्त्यात खड्डे की खड्ड्यातील रस्ता अशा प्रकारची रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून वाहन चालकांना आपल्या ताब्यातील वाहने हाकने मोठे जिकरीचे झाले आहे. तर पादचाऱ्यांना खाच खळग्यातूनच मार्गक्रमण करावे लागत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अडखळ येथील हद्दीतच मासेमारांच्या मासेमारी बोटीं खाडी किनारी भागात लावून ठेवल्याने येथे सध्या वाहनांची वर्दळ खुपच वाढलेली आहे. सतत सकाळपासून अगदी रात्रीपर्यंत मासेमार बांधव तसेच बोटींची डागडुजी करणारे कारागीर यांची सतत ये जा याच एकमेव मार्गावरून सुरू असते. असा हा मार्ग कळंबटपासून ते वाघवे म्हैसोंडे तसेच अडखळ गावच्या अडखळ घाग वाडी, बौद्ध वाडी, पाटीलवाडी नंबर १ आणि पाटील वाडी नंबर २ येथील रहिवाशांना आंजर्ले पाजपंढरी हर्णै येथे येण्यासाठी याच एकमेव रस्त्याचा उपयोग करावा लागतो. त्यामुळे या रस्त्याचे वाहतुकीच्या दृष्टीने अधिक महत्व आहे. याच मार्गावर कदमवाडी येथील श्री अंबे मातेच्या मंदीराजवळ एक छोटेखानी काॅजवे आहे. जरा जरी पाऊस कोसळला तरी या काॅजवेवरुन पाणी वाहू लागते, असा काॅजवे सध्या धोकादायक स्थितीत आहे. त्यामुळे काॅजवेवरुन वाहतूक करणे म्हणजेच माहीत असूनही जीव धोक्यात घालणे असाच प्रकार आहे.

टाईम्स स्पेशल

अडखळ हद्दीतील खाडी किनारी काळकाई ठिकाणी मासेमारी बोटीं लावण्यात आलेल्या ठिकाणाकडे जाण्याच्या जोड रस्त्यापासून ते आंजर्ले पाजपंढरी मार्गावरील अडखळ फाटयापर्यत रस्त्याची खुपच दुरवस्था झाली आहे. अगदी स्थानिक स्वराज्य संस्था अर्थातच ग्रामपंचायत कार्यालय इमारती ठिकाणी, श्री अंबे मातेच्या मंदीराजवळ घागवाडीकडे जाणा-या रस्त्याच्या चढात अडखळ बौद्धवाडीपासून पुढे खुपच रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे आताच वाहतूक धोक्याची झाली आहे. त्यात अख्खा पावसाळा हंगाम याच एकमेव रस्त्याचा वापर करुन वाहतूक करावी लागणार आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या उद्भवलेल्या परिस्थितीकडे डोळस दृष्टीने पाहून किमान धोका टाळण्यासाठी तरी खबरदारी घेऊन काॅजवेच्या सुधारणा कामासह रस्त्यातील खड्डे बुजवून रस्ता वाहतूक योग्य होण्यासाठी अधिक लक्ष दिले पाहिजे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg