loader
Breaking News
Breaking News
Foto

महायुतीचे टेन्शन वाढले, ८ जागांवर बंडखोरीचा मोठा धोका, महाविकास आघाडीमध्ये संभ्रमावस्था

मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीचे अर्ज दाखल झाल्यानंतर रणधुमाळी सुरु झाली आहे. अनेक नेत्यांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. महायुतीत बंडखोरीची लागण जास्त असून बंडखोरांना रोखण्याचे टेन्शन वाढले आहे. बंडखोर उमेदवारी मागे घेतीलही पण त्यांचीही अट असणार आहे. त्यामुळे द्या आणि घ्या असा व्यवहार होणार आहे. रायगड, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ, पुणे, अमरावती, नाशिक, परभणी, नांदेड, जळगाव या जिल्ह्यात बंडखोरी झाली असून रायगडमध्ये राष्ट्रवादी कडून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी मिळाली. त्यांच्याविरोधात शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींची मुलगी जुईली दळवी हिने बंडखोरी केली आहे. ही बंडखोरी आहे की सेनेच्या हाती राजकरण? याचा उलगडा येत्या काही दिवसात होइल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संभाजीनगर, जालनामध्ये भाजपकडून सुहास शिरसाट यांना उमेदवारी मिळाली आहे. त्याठिकाणी शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांचा मुलगा समीर सत्तारने बंडखोरी केली आहे. एकनाथ शिंदेंनी सत्तारांना तातडीने मुंबईत बोलावून घेतले आहे. यवतमाळ शिवसेनेकडून दुश्यंत चतुर्वेदी यांना उमेदवारी मिळाली असून भाजपचे नितीन भूतडा, राष्ट्रवादीकडून साजीद बेग यांची बंडखोरी आहे. अमरावतीत भाजपकडून प्रविण कोटेंना उमेदवारी मिळाली तर शिवसेनेचे विकलव बाजूरी यांची बंडखोरी. पुण्यात राष्ट्रवादीकडून विक्रम काकडेंना उमेदवारी तर भाजपचे प्रदिप कंद यांची बंडखोरी परभणी शिवसेनेकडून सईदा खान यांना उमेदवारी तर राष्ट्रवादी कडून विजय जामकर आणि संग्राम जामकर यांची बंडखोरी जळगाव भाजपकडून नंदकुमार महाजन यांना उमेदवारी तर शिवसेनेचे रेश्मा काळे, दिपक धांडेंची बंडखोरी.

टाईम्स स्पेशल

महाविकास आघाडीत नांदेडमधून रामदास सुमठाणकर काँग्रेसकडून मैदानात. त्याठिकाणी माधवराव जवळकरांची बंडखोरी तर शिवसेना ठाकरे पक्षातर्फे कृष्णा आष्टीकर यांची बंडखोरी. सोलापूर काँग्रेसकडून आदित्य फत्तेपूरकर यांना उमेदवारी शरदपवार गटाकडून वसंत देशमुख आणि शिवसेना ठाकरे गटाकडून नागेश अक्कलकोटे यांना उमेदवारी. सांगलीमध्ये बाळासाहेब पाटलांचा अर्ज तर काँग्रेसचे संजय मेंढे आणि मयुर पाटलांचा अर्ज. भंडारा-गोंदियामधून काँग्रेसकडून प्रफुल्ल अग्रवाल यांना उमेदवारी तर नरेश बनसोडे यांचा अर्ज. दरम्यान बंडखोरी रोखण्याचा प्रयत्न सुरु असून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ४ जून ही तारिख आहे. त्यामुळे तेव्हाच कळून येईल की बंडखोरी कोणी केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg