loader
Breaking News
Breaking News
Foto

इंग्लंडच्या काऊंटी क्रिकेटमध्ये रत्नागिरीचा अविराज गावडे पुन्हा चमकला; पहिल्याच सामन्यात अष्टपैलू कामगिरी

रत्नागिरी : इंग्लंडमधील प्रतिष्ठित काऊंटी क्रिकेट लीगमध्ये सलग दुसऱ्यांदा भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान रत्नागिरीच्या अविराज अनिल गावडे याला मिळाला आहे. २०२६ हंगामातील पहिल्याच सामन्यात त्याने दमदार अष्टपैलू खेळी करत आपल्या संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. ‘लंडन टायगर्स’ संघाविरुद्ध खेळताना अविराजने फलंदाजीत ३६ चेंडूंमध्ये ४८ धावांची खेळी केली. त्यानंतर गोलंदाजीतही प्रभावी कामगिरी करत ९ षटकांत ३ बळी मिळवले. याशिवाय क्षेत्ररक्षणात एक झेल टिपत त्याने आपल्या अष्टपैलू क्षमतेची झलक दाखवली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गेल्या वर्षी २०२५ च्या काऊंटी क्रिकेट लीगमध्ये अविराजने सहा वेळा सामनावीर पुरस्कार पटकावला होता. तसेच उत्कृष्ट गोलंदाजाचा किताबही त्याने आपल्या नावावर केला होता. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीची दखल घेत यंदाही त्याची मिडलसेक्स काऊंटी क्रिकेट लीगसाठी निवड करण्यात आली आहे. यंदाच्या हंगामात अविराज मिडलसेक्स काऊंटी क्रिकेट लीगमधील १५ तसेच मिडलसेक्स प्रीमियर लीगमधील १३ सामने खेळणार असून, त्याच्याकडून आणखी दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. रत्नागिरीच्या या युवा क्रिकेटपटूच्या यशामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg