मालवण (प्रतिनिधी) -मालवण येथील दांडी किनार्यावर पूर्व वैमनस्यातून झालेल्या मारहाणीतील विरुद्ध गटाच्या जखमी नितीन द्वारकानाथ तोडणकर (वय ५० वर्षे), युवराज नितीन तोडणकर (वय २२), भावेश निशाकांत तोडणकर (वय २२), वरद निशाकांत तोडणकर (वय २२) वर्षे, नेहा निशाकांत तोडणकर (वय ४५) (सर्व राहणार दांडी, मालवण) यांना अति. सत्र न्यायाधीश ओरोस-सिंधुदुर्ग यांच्या न्यायालयात सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. संशयीतांतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई, ॲड. यतिश खानोलकर, ॲड. अंबरीष गावडे व ॲड. मेधा परब यांनी यांनी काम पाहिले.
मालवण दांडी येथील दोन गटांमधील वादातून समुद्रकिनाऱ्यावर भांडण झाले व त्यात नितीन तोडणकर व राजन कांदळगावकर यांना सुजल संतोष केळुसकर, संतोष केळुसकर व सुहास कोयंडे यांना बियर च्या बाटलीने व दांडे व लोखंडी रॉडच्या साह्याने मारहाण केल्याची व तेथे सोडविण्यास आलेल्या महिलांशी लज्जास्पद वर्तन केल्याची तक्रार दि. १६ जानेवारी २०२६ रोजी युवराज तोडणकर याने मालवण पोलिस ठाण्यात दाखल केली होती. त्यानंतर रात्रौ उशीरा सुजल केळुसकर याने देखील त्याला व त्याच्या कुटुंबियांना मारहाण केल्याची व महिलांशी लज्जास्पद वर्तन केल्याची तक्रार संशयीतांविरूद्ध मालवण पोलीस ठाण्यात दिली.
त्यावरून नितीन तोडणकर वगैरे पाच यांच्या विरुद्ध भारतीय न्याय्य संहिता कलम 1१८(१), ११५(२), १८९(२) (४), १९०, १९१(२), ३५१(२), ३२४(२), ३७(३), १३५, ७५(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. जखमी नितीन तोडणकर व राजन कुमठेकर हे झालेल्या दुखापतीमुळे रुग्णालयात दाखल होते. त्यानंतर संशयीतांतर्फे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. जामीन अर्जाचे सुनावणीअंती मे. अति. सत्र न्यायाधीश ओरोस यांच्या न्यायालयाने संशयितांना प्रत्येकी रक्कम रु. ५० हजार चा सशर्त जामीन मंजूर केला.




































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.