loader
Breaking News
Breaking News
Foto

किंजळे तर्फे नातू कळकरायवाडी येथील ग्रामस्थांनी चाकरमान्यांच्या मदतीने श्रमदानाने पाणवठे केले स्वच्छ

खेड (प्रतिनिधी)- किंजळीतर्फे नातू कळकरायवाडी येथील ग्रामस्थांनी वाडीतील कोरडे पडलेले पाणवठे स्वच्छ करण्यासाठी चाकरमानी यांच्या मदतीने एकमुखाने निर्णय घेतला आणि दिनांक 31 मे रोजी आपलं स्वच्छता अभियान श्रमदानाने पूर्ण केलं. मुंबई पुण्याहून चाकरमानी सकाळी नऊ वाजता गावात दाखल झाले आणि स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली. पहिले लक्ष त्यांनी 36 फूट खोल वाडीला पाणी देणारी विहीर साफसफाई करण्याचं ध्येय निश्चित केलं. या खोल विहिरीत उतरून सफाई करणं धोक्याचं काम होतं पण चाकरमानी यांच्या मदतीने ग्रामस्थ पूर्ण तयारीत होते. मुंबईतील राजधानी ट्रेकरच्या दोन शिलेदारांनी रोप बांधून वाडीतील पाच शिलेदारांना विहिरीत उतरवलं.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आत तीन फूट साचलेला गाळ होता वरच्या शिलेदारांनी बादलीला रस्सी बांधून खालून भरलेला गाळ वर खेचला. अंदाजे चार तासात विहीर पूर्ण साफ झाली. मोहीम फत्ते करून खाली उतरलेल्यांना पुन्हा रोपानेच वर घेतलं. त्यानंतर थोडी विश्रांती घेऊन दुसऱ्या मिशनकडे ग्रामस्थ वळले. वाडीतील जुना पानवठा जो दगड मातीने पूर्ण भरला होता त्यामुळे पाणी साठत नव्हतं. गावातील ज्येष्ठ म्हणाले की "हे काम होणार नाही जेसीबी लागेल," पण सर्व चाकरमान्यांनी ठरवलं ही मोहीम अर्धवट सोडायची नाही आणि दुपारी जेवणानंतर चार वाजता पुन्हा काम सुरू केलं आणि साडेसहा वाजता पाणवठा मोकळा करून शिलेदार बाहेर पडले.

टाईम्स स्पेशल

या मोहिमेत ज्येष्ठांपासून तरुणांपर्यंत सगळे ग्रामस्थ सहभागी झाले होते. रात्री उशिरा मोहीम फत्ते करून चाकरमानी पुन्हा आपल्या कर्मभूमीकडे रवाना झाले. अशाप्रकारे चाकरमानी आणि ग्रामस्थांच्या मदतीने एकजुटीने गावातील पाणवठे पावसाळ्याआधी स्वच्छ करण्यात आले. त्यांचे हे श्रमदान सर्वांसाठी प्रेरणादायक आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg