loader
Breaking News
Breaking News
Foto

ओबीसींच्या जातीनिहाय जनगणनेसाठी देवरूख येथे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू

देवरूख (वार्ताहर): ओबीसींची जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे.. अशा घोषणाबाजीने सोमवारी देवरुख दणाणले. ओबीसी जनमोर्चा संगमेश्वर तालुक्याच्यावतीने देवरूख येथे बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरूवात करण्यात आली. या आंदोलनाला मोठा प्रतिसाद लाभला. ओबीसींची जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे या मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. भारतरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला सुरूवात करण्यात आली. ‘एकच पर्व ओबीसी सर्व..’, ‘ओबीसींची जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे..’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या ठिय्या आंदोलनात ओबीसींची एकजूट बघायला मिळाली. या आंदोलनात ओबीसी नेते सुरेश भायजे, अविनाश लाड, सहदेव बेटकर, संतोष थेराडे, कृष्णा हरेकर, बापू गांधी, संतोष लाड, सुशिल भायजे, अमोल लाड, नितीन लोकम, दत्ताराम लाखण, धोंडू करंबेळे, संदीप धावडे, शीतल करंबेळे, प्रियांका सुवरे, दुर्वा पाष्टे, अस्मिता घवाळी आदींसह ओबीसी समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते यांनी केले. आंदोलनादरम्यान पोलीसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg