loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री भगवती देवी विकास संस्थेकडून नावळे येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

वैभववाडी (प्रतिनिधी) - दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नावळे गावातील विद्यार्थ्यांना श्री भगवती देवी विकास संस्था मुंबई यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी संस्थेचे आभार व्यक्त केले. श्री भगवती देवी विकास संस्था मुंबई यांच्या वतीने नावे गावातील विद्यामंदिर नावळे धनगरवाडा, विद्यामंदिर नावळे बिरदेवाडी व विद्या मंदिर नावळे राणेवाडी नंबर 1 या शाळेतील पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना श्री भगवती देवी विकास संस्था मुंबई यांच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला एक डझन वह्या, कंपास, पेन आधी साहित्यांचे वाटप करण्यात आले. गेली तीन वर्ष सलग विद्यामंदिर नावळे धनगरवाडा शाळेला सेवा देणारे मुख्याध्यापक संतोष भरडकर यांची बदली झाल्यानंतर त्यांनाही शाळेच्या व ग्रामस्थांच्या वतीने निरोप देण्यात आला. यावेळी त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

यावेळी सरपंच सोनल गुरव, उपसरपंच संजय रावराणे, ग्रा. प. सदस्य तथा तंटामुक्ती अध्यक्ष संजय शेळके, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शर्वरी रावराणे, मुंबई मंडळाचे सदस्य तुषार गुरव, माजी पोलीस अधिकारी गुरव, संकेत गुरव, शाळेचे माजी मुख्याध्यापक संतोष भरडकर, मुख्याध्यापक जयकुमार माने, महाले, मुजावर आधी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg