loader
Breaking News
Breaking News
Foto

घोटगेवाडीत पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा उत्साहात शुभारंभ

दोडामार्ग (प्रतिनिधी) - राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत रविवार दि. २८ जून २०२६ रोजी जि.प. दवाखाना घोटगेवाडी येथे सकाळी आठ वाजता लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. सरपंच श्रीनिवास शेटकर, उपसरपंच सागर कर्पे व वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन शर्मा यांच्या हस्ते 5 वर्षांखालील बालकांना पोलिओ डोस पाजून मोहिमेस सुरुवात झाली. यावेळी गावातील आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मोठ्या संख्येने माता व पालक उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

डॉ. शर्मा यांनी सांगितले की, "एकही बालक पोलिओ डोसपासून वंचित राहू नये यासाठी घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे." सरपंच शेटकर यांनी सर्व पालकांना आपल्या 0 ते 5 वयोगटातील बालकांना पोलिओ डोस देण्याचे आवाहन केले. सकाळी 8:00 ते सायं. 5 वाजेपर्यंत जि.प.दवाखान्यात लसीकरण सुरू राहणार आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg