loader
Breaking News
Breaking News
Foto

सलग दोन दिवस सात जणांना चावणारा कुत्रा जेरबंद

पनवेल : पनवेल शहरात लाईनआळी परिसरात सलग दोन दिवस सात जणांना चावणारा कुत्रा अखेरीस पनवेल महापालिकेच्या श्वान पथकाने जेरबंद केला आहे. एक फिरस्ता कुत्रा रस्त्यातील पादचाऱ्यांना चावत असल्याची माहिती स्थानिक नगरसेविका दर्शना भोईर यांना काही जागृत नागरिकांनी दिली. त्यांनी तातडीने उपजिल्हा रुग्णालयाचे आरोग्य निरीक्षक डॉ.भगवान गीते, डॉ.मधुलिका लाड यांच्याशी संपर्क साधून चावा बाधित रुग्णांना आवश्यक ते उपचार करण्यास सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्याचप्रमाणे महापालिकेच्या श्वान पथकातील डॉग कॅचर निरीक्षक कल्पेश कदम, रोहित कदम, सुमित कदम, किरण सावंत, चालक संजय कदम आदींमार्फत परिसरात दोन दिवस शोध घेवून त्या कुत्र्याला ताब्यात घेतले आहे. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg