कळंबोली : 'पोलिओ लसीकरण दिना' निमित्त कळंबोली सेक्टर 10 येथील युपीएचसी सेंटरमध्ये विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचे उद्घाटन नगरसेविका व आरोग्य समिती अध्यक्षा बायजा बबन बारगजे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बायजा बारगजे म्हणाल्या, "पोलिओमुक्त भारत घडवण्यासाठी 0 ते 5 वयोगटातील सर्व मुलांना पोलिओची 2 थेंब देणे अत्यंत आवश्यक आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना पोलिओ लस देण्यास कसलीही हेळसांड करू नये. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे."
उद्घाटनप्रसंगी नगरसेवक रामदास शेवाळे, भटके विमुक्त मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे, युपीएचसीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल पाटील तसेच केंद्रातील इतर डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व आशा वर्कर्स उपस्थित होत्या. डॉ. अनिल पाटील यांनी पोलिओ लसीकरणाचे महत्त्व व फायदे पालकांना समजावून सांगितले. युपीएचसी स्टाफने केंद्रात येणाऱ्या सर्व लहान मुलांना पोलिओच्या 2 थेंब पाजल्या. कार्यक्रमाच्या शेवटी सौ. बायजा बारगजे यांनी आरोग्य कर्मचारी व आशा वर्कर्सच्या मेहनतीचे कौतुक केले. "पोलिओमुक्त कळंबोली" हे आपले ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.

































































2.jpg)































































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.