loader
Breaking News
Breaking News
Foto

कांदाट येथे श्री कुंभाळजाई देवी मंदिर प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा

खेड (प्रतिनिधी) - ऐतिहासिक जावलीकर मोरे घराण्याची कुलस्वामीनी आई कुंभळजाई देवीची मुर्ती, श्री निरिपजी देवी देवालय देवस्थान, कांदाट जावली येथे होती. ही मुर्ती अतिशय जीर्ण झाल्याने सकल मोरे कुलबांधवांनी कुलस्वामीनीची नवीन शास्त्राधारीत मुर्ती घडवली आहे. ही नवीन मुर्ती नुतन देवालय वास्तूमध्ये प्राणप्रतिष्ठापना व देवालयाचे कलशारोहन सोहळा शुक्रवार दि. ८ मे, २०२६ रोजी, श्री निरिपजी देवी देवस्थान कांदाट जावली, मौजे कांदाट, ता. महाबळेश्वर, जि. सातारा येथे संपन्न होणार आहे. श.प्र. १०८ ज्ञानभास्कर शिवाचार्य श्री वाईकर महाराज, वाई मठ यांच्या हस्ते कलषारोन होणार असून विधीचे पौराहित्य रायगडभुषण श्री प्रकाशस्वामी जंगम हे करणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या मंगल सोहळ्यास उपमुख्यमंत्री मा. श्री एकनाथजी शिंदे साहेब, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदआबा पाटील व गृहराज्य मंत्री योगेश कदम हे प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित राहणार आहेत. संत साहित्याचे गाढे अभ्यासक सदानंद मोरे हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. याशिवाय अनेक मान्यवर या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. मोरे घराण्याच्या कुलस्वामीनीचा हा ऐतिहासिक सोहळा शेकडो वर्षातून होत असून या सोहळ्यासाठी महाबळेश्वर, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, पोलदापूर, महाड, मुंबई, पुणे व महाराष्ट्राच्या विविध भागातून २० ते २५ हजार मोरे बंधू सगेसोयरे, मित्रमंडळी उपस्थित राहणर आहेत, या सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी सर्व मोरे बांधवांना विनम्र आवाहन करण्यात येत आहे. किशोर शंकरराव मोरे सचिव, श्री निरिपजी देवी देवालय न्यास कांदाट यांनी आव्हान केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg