loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकणातील राजापूरच्या हापूस आंब्याचा गोडवा दिल्लीत…!

देवळे (प्रकाश चाळके) - महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे आयोजित करण्यात आलेल्या “कोकण हापूस आंबा महोत्सवा”त राजापूरच्या प्रसिद्ध हापूस आंब्याने अक्षरशः दिल्लीकरांची मने जिंकली. कोकणच्या मातीत पिकलेल्या सुगंधी आणि रसाळ हापूस आंब्याला दिल्लीकरांनी मोठी पसंती दर्शवत अवघ्या तीन तासांत तब्बल १००० डझन आंब्यांची विक्री झाली. राजापूर तालुक्यातील आंबा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी हा महोत्सव मोठी संधी ठरली असून कोकणच्या हापूसचा गोडवा थेट देशाच्या राजधानीत पोहोचल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महाराष्ट्र सदन येथे सकाळपासूनच आंबा खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. अनेकांनी राजापूर हापूसची चव घेत त्याचे विशेष कौतुक केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आंबा उत्पादक ओंकार प्रभुदेसाई यांनी आपल्या शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांचे विशेष कौतुक होत आहे. या महोत्सवात राजापूर तालुका कृषी अधिकारी अमोल सकपाळ यांनी देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावत शेतकरी आणि व्यापाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन केले. त्यांच्या नियोजनामुळे आणि समन्वयामुळे दिल्लीत कोकण हापूसची प्रभावी मांडणी करण्यात यश आले. या उल्लेखनीय यशाबद्दल राजापूर-लांजा-साखरपा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी ओंकार प्रभुदेसाई आणि कृषी अधिकारी अमोल सकपाळ यांचे विशेष अभिनंदन केले. “राजापूरचा हापूस हा कोकणची ओळख आहे. देशाच्या राजधानीत या आंब्याला मिळालेला प्रतिसाद हा आपल्या शेतकऱ्यांच्या मेहनतीचा सन्मान आहे. अशा उपक्रमांमुळे कोकणातील शेतकऱ्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल,” असे आमदार किरण सामंत यांनी सांगितले. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवामुळे कोकणच्या कृषी उत्पादनाची देशपातळीवर मोठी ओळख निर्माण झाली आहे. राजापूरच्या हापूसने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची छाप उमटवत दिल्लीकरांची मने जिंकली असून कोकणच्या शेतकऱ्यांसाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg