loader
Breaking News
Breaking News
Foto

परमार्थिक सेवा प्रतिष्ठान पुणे आयोजित तीन दिवसीय अखंड कीर्तन सोहळा व वारकरी प्रशिक्षण संपन्न

वरवेली (गणेश किर्वे) - परमार्थिक सेवा प्रतिष्ठान पुणे आयोजित अखंड कीर्तन सोहळा व वारकरी प्रशिक्षण मोठ्या आनंदोत्सवात प्रतिष्ठानचे सभासद साधक व दानशूर भाविकांच्या सहकार्याने महालक्ष्मी मंदिर, बारगोडेवाडी ग्रामस्थ महिला मंडळ मु.पो. वेळंब ता. गुहागर येथे निसर्गरम्य वातावरणात संपन्न झाला. दररोज पहाटे काकड आरती, पारायण, कीर्तने, सायं.हरिपाठ व महाप्रसाद असे कार्यक्रमाचे स्वरूप होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमांमध्ये ह. भ. प. रियाताई भुवड (वडद गुहागर), ह. भ. प. उज्वलाताई वेदपाठक(पुणे), ह. भ. प. छायाताई चव्हाण (वडद), ह. भ. प. मनाली ताई धायगुडे (मुंबई), ह. भ. प. आशाताई कनवजे (मुंबई), ह. भ. प. ज्योतीताई खांडेकर (मुंबई), ह. भ. प. चारुशीला ताई गुल्हाणे (सुरत), ह. भ. प. गायत्री ताई देशमुख(पुणे) तसेच ह. भ. प. चंद्रकांत कदम (मुंबई), ह. भ. प. गिरीश पांडे (संभाजीनगर), ह. भ. प. ऋषिकेश चव्हाण (आळंदी), ह. भ. प. गौरव मुळे (मुंबई), ह. भ. प. भावेश शिंदे या सर्व कीर्तनकारांचे कीर्तने आणि ह. भ. प. रंगनाथजी नाइकडे महाराज(पुणे) यांचे काल्याचे कीर्तन भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.

टाइम्स स्पेशल

तसेच कार्यक्रमाची सांगता कीर्तनकारांच्या व दानशूर भाविकांच्या सन्मानाने करण्यात आली. अखंड कीर्तन सोहळा व वारकरी प्रशिक्षण कार्यक्रम गुरुवर्य प्रकाश महाराज, गुरुवर्य रमेशमहाराज बारगोडे गुरुवर्य भरत महाराज हभप प्रविण महाराज मुळे तसेच सर्व सन्माननीय मंडळींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg