loader
Breaking News
Breaking News
Foto

रुग्णांसाठी शुद्ध पाणी उपलब्ध; डॉ. बांदेकर यांचे योगदान

सावंतवाडी - सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना पिण्यासाठी स्वच्छ व निर्जंतुक पाणी उपलब्ध व्हावे म्हणून डॉ. सिद्धेश सुभाष बांदेकर यांनी त्यांची मावशी सौ. नीता अरुण म्हापसेकर व आजी श्रीमती मनोरमा सीताराम रांगणेकर यांच्या स्मरणार्थ दोन अक्वा गार्ड भेट दिल्या. आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी दानशूर व्यक्तींनी जिल्हयातील सर्वच शासकीय रुग्णालयाना त्यांच्या आवश्यकते नुसार रुग्णोपयोगी वस्तू द्याव्यात, असे सांगून डॉ. सिद्धेश बांदेकर यांच्या दातृत्वा बद्दल त्यांचे आभार मानले. यावेळी डॉ. अनिकेत गुरव, कार्यालयीन अधीक्षक रुपाली हेळेकर, सिस्टर प्राची राणे, वैष्णवी गोसावी, सुप्रिया नाईक, अमृता मुंगी, उज्वला रांजणकर, हेमांगी रणदिवे तसेच डॉ. सिद्धेश बांदेकर, डॉ . सिद्धेश म्हापसेकर, सौ. प्राची बांदेकर, यशवंत देसाई, अरुण म्हापसेकर, दीपक म्हापसेकर, संजय म्हापसेकर वगैरे उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg