खेड (प्रतिनिधी) - खेड शहरातील कचरा व्यवस्थापनातील मोठा घोटाळा उघडकीस आला असून, नगरपालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सामाजिक कार्यकर्ते रमजान जसनाईक आणि निगडे-बोरज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आत्माराम शिगवण यांनी या प्रकरणात लक्ष घालत धक्कादायक बाबी समोर आणल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातून संकलित होणारा कचरा प्रक्रिया न करता थेट निगडे गावच्या हद्दीत असलेल्या जांभा खाणीत टाकला जात आहे. कचरा प्रक्रिया करण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आलेली असतानाही कोणतीही प्रक्रिया न करता सरळ कचरा खाणीत टाकला जात असल्याने हा प्रकार गंभीर मानला जात आहे.
ही जांभा खाण बोरज धरणाच्या जलाशयाजवळ असल्याने पर्यावरण आणि पाणीपुरवठ्यावर मोठा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः पावसाळ्यात कचर्यातून बाहेर पडणारे दूषित पाणी धरणात मिसळण्याची शक्यता असून, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकरणामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, प्रशासनाविरोधात नाराजी वाढत आहे. शासनाची फसवणूक आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या प्रकाराविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते रमजान जसनाईक आणि माजी सरपंच आत्माराम शिगवण यांनी या प्रकरणी ठाम भूमिका घेतली असून, संबंधित ठेकेदार आणि खेड नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच, वेळ पडल्यास या प्रकरणात न्यायालयीन लढाई लढण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.





























































































































.jpg)







































































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)

















































































































































































































1.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.