loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीत 'सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान'च्या रुग्णवाहिकेचे शानदार लोकार्पण

​सावंतवाडी (प्रतिनिधी) - 'रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा' हे ब्रीदवाक्य समोर ठेवून कार्यरत असलेल्या 'सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान'च्या वतीने महाराष्ट्र दिन व सिंधुदुर्ग स्थापना दिनाचे औचित्य साधून नव्याने उपलब्ध झालेल्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी येथे संपन्न झाला. सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि फीत कापून ही रुग्णवाहिका रुग्णसेवेसाठी सज्ज करण्यात आली. ​लोकार्पण सोहळ्याप्रसंगी युवराज लखमराजे भोसले यांनी प्रतिष्ठानच्या कार्याचा गौरव केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​या ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण सोहळ्याला अनेक मान्यवर आणि प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये प्रमुख पाहुणे युवराज लखमराजे भोसले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते आनंद रासम, प्रा. सुभाष गोवेकर, अनंत उचगावकर, राजू केळूसकर, जितेंद्र मोरजकर, उदय अळवणी, राजू मसुरकर, एन. बी. रेडकर, ज्येष्ठ नागरिक अरुण मेस्त्री, सोमनाथ जिगजिन्नी, सुधीर पराडकर, रवींद्र माने, राम वाडकर, चंद्रकांत घाटे, प्रवीण सूर्यवंशी, प्रवीण केसरकर, सुनील नाईक, अभिमन्यू लोंढे, प्रसाद परब, तसेच सौ. धोंड, सौ. रेडकर, अनुजा साळगावकर, श्री. पावसकर आणि राजू धारपवार यांचा समावेश होता. ​तसेच, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे प्रा. सतीश बागवे, प्रा. शैलेश नाईक, रवी जाधव, संजय पेडणेकर, लक्ष्मण कदम, रूपा मुद्राळे, शरदिनी बागवे, समीरा खलिल, हेलन निब्रे, शेखर सुभेदार आदी कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg