सावंतवाडी १ मे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र प्रदेश कोकण परीट (धोबी) मडवळ समाज संघाचा कोकणचा राज्यस्तरीय भव्य स्नेह मेळावा रविवार, दि. ३ मे रोजी सकाळी १० वाजता रोहा येथे आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा डॉ. चिंतामणराव द्वा. देशमुख शहर सभागृह, रोहा नगरपरिषदेसमोर, मु. पो. रोहा, जिल्हा रायगड येथे संपन्न होणार असून, महाराष्ट्र प्रदेश कोकण परीट (धोबी) मडवळ समाज संघाचे अध्यक्ष शांताराम भाऊ कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.
या मेळाव्यास अखिल भारतीय धोबी महासंघाचे उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे, उपाध्यक्ष राजेंद्र शेठ आहरे, माजी प्रदेश अध्यक्ष राजेंद्र शेठ खैरनार, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खंडेराव कडलक, महिला प्रदेश अध्यक्ष रेखाताई रमाकांत शेठ कदम, महाराष्ट्र प्रदेश कोकण परीट मडवळ समाज संघाचे कार्याध्यक्ष दिलीप चंद्रकांत भालेकर, युवा अध्यक्ष संतोष भालेकर, तसेच गोविंद राऊत, सुनील फंड, गोवा राज्य अध्यक्ष नारायण पिसूर्लेकर, बेळगाव (कर्नाटक) अध्यक्ष अशोक जाधव, माजी महापौर (पुणे) व माजी प्रदेश अध्यक्ष सुरेश नाना नाशिककर आणि संघटक प्रशांत शांताराम भाऊ कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व परीट बंधू आणि भगिनींनी या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर (९४२२५८६११४) यांच्याशी संपर्क साधावा.































































































































.jpg)







































































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)

















































































































































































































1.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.