loader
Breaking News
Breaking News
Foto

नवीन विद्युत ट्रान्सफॉर्मरकरीता कुणकेरीवासियांचे महावितरण समोर उपोषण

सावंतवाडी : कुणकेरी गावात दोनच ट्रान्सफॉर्मर असल्यामुळे या गावाला कमी दाबाने वीज पुरवठा होतो. तसेच या गावात विजेच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. कुणकेरी गावात १३ वाड्यांसाठी दोनच ट्रान्सफॉर्मर आहेत. त्यात लिंगाचीवाडी येथील ट्रान्सफॉर्मर वरून जाणाऱ्या वीज वाहिनीवर सर्वाधिक ग्राहक आहेत. नेहमीच या ७ वाड्यांमध्ये कमी दाबाचा वीजपुरवठा होतो. अनेकदा विद्युत उपकरणांत बिघाड होऊन चालत नसल्यामुळे ते बिनकामाचे ठरतात. त्यामुळे गावात नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याबाबत अनेक वेळा महावितरणचे लक्ष वेधण्यात आल्यानंतरही कार्यवाही होत नसल्याने कुणकेरी ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयासमोर महाराष्ट्र दिना दिवशी उपोषण छेडले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी ग्रामस्थ म्हणाले, मागच्या वर्षी पालकमंत्री नितेश राणे यांच्या जनता दरबारामध्ये सुद्धा हे प्रकरण मांडण्यात आले‌ होते. यानंतर अधिकाऱ्यांनी काम पूर्ण करण्याचे आश्वासन देखील दिले. पण, अद्याप परिस्थिती जैसे थे आहे. अधिकाऱ्यांनी गावात येऊन ट्रान्सफॉर्मर बसवण्याबाबत सर्वे केला. जमीन मालकाने जागाही उपलब्ध करून दिली. परंतु, या ट्रान्सफॉर्मरचा अध्याप पत्ताच नाही असा आरोप कुणकेरी ग्रामस्थांनी केला. तसेच याचा जाब विचारण्यासाठी ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयासमोर महाराष्ट्र दिनादिवशी उपोषण छेडले. जोपर्यंत या प्रश्नावर ठोस कार्यवाही होत नाही तोपर्यंत उपोषण चालूच राहील असा इशारा दिला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, माजी सभापती प्रमोद सावंत, कुणकेरी सरपंच सोनिया सावंत, उपसरपंच सुनील परब, माजी सरपंच विश्राम सावंत, राजश्री चव्हाण, सारिका चव्हाण, संतोष चव्हाण, वेदिया सावंत, उज्वला सावंत, कृष्णकांत सावंत, सुरेश सावंत, काव्या सावंत, किरण सावंत, विनायक सावंत, विनोद सावंत, भरत सावंत, नारायण राणे, सखाराम सावंत, महादेव सावंत, मनोज घाटकर, साहिल सावंत आदी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg